Ad will apear here
Next
भारतीय प्रत्‍यक्ष विक्री क्षेत्रात ५३ टक्के उद्योजक महिला
मुंबई : वर्ल्‍ड फेडेरेशन ऑफ डायरेक्‍ट सेलिंग असोसिएशन्‍सने (डब्‍ल्‍यूएफडीएसए) सादर केलेल्‍या अहवालानुसार भारतातील १.५ बिलियन डॉलर्स (९८.५ बिलियन रुपये) प्रत्यक्ष विक्री क्षेत्रामध्‍ये तब्बल ५३ टक्‍के उद्योजक महिला आहेत. या अहवालानुसार, भारतीय प्रत्‍यक्ष विक्री क्षेत्राने २०१७मध्‍ये ५.१ दशलक्ष लोकांना उद्योजकतेची संधी दिली. यात २.७ दशलक्ष महिला होत्‍या. त्यामुळे, भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना या क्षेत्रामध्‍ये महिला उद्योजकांकडून होत असलेल्‍या योगदानांमध्ये प्रचंड वाढ दिसून येते.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारत व चीनमध्‍ये समान प्रत्‍यक्ष विक्री उद्योजक असले, तरी विक्री निर्माणाच्‍या बाबतीत चीन अग्रेसर आहे. २०१७मध्‍ये भारतातील जवळपास ५.१ दशलक्ष उद्योजक प्रत्‍यक्ष विक्रीमध्‍ये सामील होते. चीनमध्‍ये हा आकडा ५.३ दशलक्ष होता. २०१७मध्‍ये चीनमध्‍ये करण्‍यात आलेली विक्री ३४.२९ बिलियन डॉलर्स होती, या तुलनेत भारतातील विक्री १.५ बिलियन डॉलर्स होती.

क्‍यूनेटचे दक्षिण आशियामधील प्रादेशिक सल्‍लागार प्रमोद मंदा म्‍हणाले, ‘भारत ही प्रत्‍यक्ष विक्रीसाठी संपन्‍न बाजारपेठ आहे. योग्‍य कायदे नसताना देखील हे क्षेत्र बिलियन-डॉलर बाजारपेठ बनले आहे. प्रत्‍यक्ष विक्री क्षेत्र लोकांना उद्योजकता संधी देण्‍यासोबतच त्‍यांच्या कौशल्यांचा विकास करण्‍यासाठी उत्‍तम प्रशिक्षण देणारे माध्‍यम देखील आहे.’

दरम्‍यान एफआयसीसीआय-केपीएमजीच्या अहवालात असा अंदाज बांधण्यात आला आहे की पुरेशा नियामक पाठबळासह प्रत्‍यक्ष विक्रीमधील रिटेल विक्री २०२५पर्यंत ६४५ बिलियन रुपयांपर्यंत पोहोचेल; तसेच २०२५पर्यंत १८ दशलक्ष भारतीयांना स्‍वयं-रोजगाराची संधी देईल, ज्‍यापैकी ६० टक्‍के महिला असतील.

टास्‍क फोर्स टू डायरेक्‍ट सेलिंग असोकॅमचे अध्‍यक्ष विजय सरदाणा म्‍हणाले, ‘प्रत्‍यक्ष विक्री संधी या आज रोजगार निर्मितीच्‍या आव्‍हानांचा सामना करत असलेल्‍या भारतामध्‍ये स्‍वयं-रोजगार संधी निर्माण करण्‍याचा उत्तम मार्ग आहेत. प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष रोजगार निर्माण करण्‍यासोबतच सेवा देण्‍याची क्षमता अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये योगदान देते आणि महिला व तरुणांसाठी कौशल्‍ये विकास करण्‍यामध्‍ये मदत करते; पण यासाठी या क्षेत्राच्‍या सर्व भागधारकांचे स्‍पष्‍ट नियामक आराखड्यासह संरक्षण होणे आवश्‍यक आहे.’

विक्रीच्‍या संदर्भात २०१७मधील जगातील सर्वात मोठ्या अव्‍वल १० प्रत्‍यक्ष विक्री बाजारपेठांमध्‍ये पाच देश आशियामधील आहेत, असे ‘डब्‍ल्‍यूएफएसए’चा अहवाल सांगतो. युनायटेड स्‍टेट्स ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असण्‍यासह चीन दुसऱ्या स्‍थानावर आहे; पण २०१७मध्‍ये एशिया पॅसिफिक प्रांत जागतिक प्रत्‍यक्ष विक्री क्षेत्रातील सर्वात मोठे योगदानकर्ते म्‍हणून उदयास आले आहे. २०१७मध्‍ये एशिया पॅसिफिक प्रांताने प्रत्‍यक्ष विक्री क्षेत्राने केलेल्‍या जागतिक विक्रीमध्‍ये ४६ टक्‍क्‍यांचे योगदान दिले. या प्रांतातील ६५ दशलक्षहून लोक या योगदानामध्‍ये सामील होते.

ग्‍लोनुत्रा कॉर्पोरेशनचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राजेश कुमार म्‍हणाले, ‘उद्योजकता हा मूलभूत पाया आहे, ज्‍यावर प्रत्‍यक्ष विक्रीचा व्‍यवसाय चालतो. उद्योजकता पद्धतीमुळे हे क्षेत्र दोन-अंकी विकास करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करेल. ‘डब्‍ल्‍यूएफडीएए’चा भारतावरील अलीकडील डेटा वर्षांनुवर्षे या क्षेत्राने केलेली प्रगती आणि क्षेत्रामध्‍ये सातत्‍याने अथक मेहनत घेणाऱ्या आमच्‍या विक्री कर्मचाऱ्यांनी हे ध्‍येय प्राप्‍त करण्‍यासाठी दिलेले योगदान दाखवतो. भारत ही मोठी बाजारपेठ असण्‍यासोबतच या बाजारपेठेमध्‍ये अमर्यादित क्षमता आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZXZBS
Similar Posts
‘सेफएज्युकेट’चा महिला उद्योजकांसाठी ‘सेफप्रोनर्स’ उपक्रम मुंबई : सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात विशेष नैपुण्य असणाऱ्या ‘सेफएज्युकेट’ या कंपनीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफप्रोनर्स’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनीने व्यवसायविषयक आकांक्षा असणाऱ्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रातील पाच महिलांची निवड केली आहे
‘झी मराठी’च्या ‘होम मिनिस्टर’ अॅपद्वारे उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ मुंबई : ‘वाटा वाटा गं, चालीन तितक्या वाटा गं...’ असे म्हणत स्वावलंबी होण्यासाठी, स्वतःचे घर चालविण्यासाठी वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायांच्या वाटा चोखाळणाऱ्या उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘झी मराठी’ने ‘होम मिनिस्टर’ नावाचे अॅप आणि वेबसाइट सुरू केली आहे. उद्योजक आणि ग्राहक यांच्यातील
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language